Disable right click

Monday, 2 June 2014

ग्रेसच्या ’चर्चबेल’ ची मी आताशा बरेचदा पारायणं करत असतो. बस किंवा ट्रेन मधून येता जाताना बयाचदा ते पुस्तक माझ्या हातात जवळपास असतंच. याआधी कधी नव्हे इतकं ते पुस्तक मला आताशा बांधून ठेवतं. त्यातल्या बयाचशा प्रतिमा इथे आल्यापासून मला जास्त ओळखीच्या वाटतात.

एकदा राहण्यासाठी एक घर पहायला गेलो होतो. त्या घराला मला प्रचंड आवडतात तशा सुंदर रंगीत खिडक्या होत्या आणि त्याच्या आवारातच चर्च होतं. ते चर्च पाह्ताना, ग्रेस तिथेच कुठेतरी असत असल्याचा शंभर टक्के अगदी जिवंत भास मला झाला. मी तिथे रहायला गेलो नाही. घर लांब होतं. आपण आपली छोटी छोटी दुःख जपून ठेवत असतो. किंवा जपून ठेवण्यासाठी आपल्या पिंडधर्माला साजेशी दुःख आपण स्वतःहून वरचेवर भोगायला तयार असतो. या असल्या छोट्या मोठ्या दुःखांचा आक्रोश ग्रेसने आमच्या आयुष्यात आताशा अमाप पेरून ठेवलाय.


: २५-०४-२०१४.

No comments:

Post a Comment